Breaking News

वनविभागाच्या रोपवाटिकेचा आ. पिचड यांचे हस्ते शुभारंभ


अकोले / प्रतिनिधी 
महाराष्ट्र शासनाच्या 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत महाराष्ट्र हिरवागार करण्यासाठी एकच लक्ष्य 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे.
आ. वैभव पिचड यांच्या हस्ते आज अकोले तहसील कार्यालयासमोरील वनविभागाने सुरू केलेल्या रोपवाटिकेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका सचिव यशवंत अभाळे, प्रा. बाबा खरात, सेवानिवृत्त तलाठी बाळासाहेब कोकणे यांच्यासह वनविभाग, अकोले पोलीसस्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.