अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरपीआय कडून निषेध
पारनेर / प्रतिनिधी
तालुक्यातील बौध्द समाजातील अल्पवयीन मुलीवर खोलीत डांबून महिनाभर अत्याचार केल्याप्रकरणी पारनेर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशासनाला आरोपीस कडक शिक्षा करण्यात यावी याकरिता निवेदन देवून निषेध करण्यात आला.
या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील वडगाव आमली येथे एक महिनाभर बौध्द समाजातील अल्पवयीन मुलीवर आरोपी रोशन सुरेश पवार (वय 20) वर्षे रा. वडगाव आमली व सचिन विठ्ठल रोहकले (वय 25) वर्षे रा. माळवाडी, भाळवणी तालुका पारनेर या दोघांनी अत्याचार करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या दोघांनी पिडीत अल्पवयीन मुलीस वडगाव आमली येथील एका शेतातील बंद खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार केले. तसेच याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास तुझा कायमचा बंदोबस्त करु, अशी धमकी अल्पवयीन मुलीस दिली. या अल्पवयीन मुलीस न्याय मिळावा यासाठी आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनावर आरपीआय युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, सचिन नगरे, बाळासाहेब कांबळे, प्रल्हाद शिंदे, नंदु साळवे, सुनिता अवचिते, रमेश बोरुडे, किशोर वाघमारे, किरण जाधव, आकाश शिंदे, अनुराधा जाधव, संतोष जाधव, शंकर पटेकर, सुनिल शिंदे, राहुल बोरुडे, प्रज्वल शिंदे आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.