Breaking News

विविध मागण्यांसाठी रास्ता रोको


अकोले 
राजूर ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळावा तसेच, राजूर गावातील अवैध धंदे बंद करावेत, या मागण्यांसाठी राजूर विकास आघाडी व ग्रामस्थांच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजूर ग्रामपंचायतीला गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे गावातील अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत. तसेच दारुबंदी म्हणून नावलौकिक असलेल्या, या गावात खुलेआम दारूविक्री सुरू आहे. पेसा अंतर्गत येणारी राजूर ग्रामपंचायत महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे, पण विकासकामे होऊ न देण्याच्या उद्देशाने काही गावातील मंडळी विकासकामांत राजकारण करीत आहे. यांसह प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी स. 9 वाजता गाव बंद करून कोल्हार घोटी राज्य मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, पं. स. सदस्य दत्ता बोर्‍हाडे, ग्रा. सदस्य भास्कर येलमामे आदी उपस्थित होते.