शशांक काळदाते यांची न्यूयॉर्क विद्यापिठात निवड
कर्जत
येथिल शशांक रामदास काळदाते यांची संगणक अभियांत्रिकीमधील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापिठामध्ये निवड झाली आहे. शशांक यांनी पुणे येथील पीआयसीटी या अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेक ही पदवी प्राप्त केली आहे.
शशांक यांनी विविध क्षेत्रामध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश मिळविले आहे. त्याला अभिनयाची आवड असून त्यांनी नाटकांचे दिग्दर्शनही केलेले आहे. शशांक यांनी दिग्दर्शन केलेल्या नाटकास मानाचा समजला जाणारा पुरूषोत्तम करंडक पुरस्कारही मिळाला आहे. शशांक यांना बासरी वादन ही कलादेखील चांगली अवगत आहे. निवडीबद्दल डॉ. संदीप काळदाते, राजेंद्र सुपेकर, नितीन देशमुख, दीपक शिंदे, नितीन तोरडमल, राहुल काकडे, अभय बोरा, सुनील भोसले अतुल कोलथे यांसह आदींनी शशांक यांचे अभिनंदन केले आहे.