वैजापुरात एकाच ओढणीने गळफास घेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या वैजापुर परिसरातील रोठीवस्ती परिसरात आढळले मृतदेह
औरंगाबाद/ प्रतिनिधी
वैजापुर शहरापासुन पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या रोठीवस्ती परिसरात प्रेमीयुगुलाने एकाच ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवार दि(दि.3) सकाळी 9 वाजेच्या सुमारास प्रेमीयुगुलाचे मृतदेह नांदूर मधमेश्वर कालव्याजवळील लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. सागर राहुल म्हैसमाळे 22 साक्षी बाबासाहेब शेजवळ 18 दोघेही रा जांबरगाव ता. वैजापुर असे मयताचे नावे आहेत. दोघे कालपासून (सोमवार) बेपत्ता होते. सागर हा छोटा मोठा व्यवसाय करून आपली उपजीवीका भागवित होता. तर साक्षी ही वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत होती.पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर शहरानजीक असलेल्या लाडगाव रस्त्यावरील रोठीवस्तीजवळील नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पोटचारीलगत असलेल्या लिंबाच्या झाडाला हे प्रेमीयुगुल लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व दोघांचेही मृतदेह वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.