सरकारची ‘एक्सपायरी’ संपली! विरोधकांची राज्यसरकारवर टीका ; चहापानावर बहिष्कार
नागपूर : सरकार म्हणून काम करताना झालेल्या चुका स्वीकारून त्या दुरूस्त करण्याची काँग्रेस आघाडी सरकारची मानसिकता होती. म्हणूनच आमचे सरकार 15 वर्ष टिकले. पण भाजप-शिवसेनेच्या सरकारची चुका स्वीकारण्याची मानसिकता नाही. उलटपक्षी ते चुका दडपू पाहत आहेत. त्यामुळे हे सरकार जाणार, हे नक्की असून, या सरकारची ‘एक्सपायरी’ आता संपल्याची घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
धनगर, मुस्लिम, मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि शिवस्मारकाबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा करणार्या या सरकारने आता अशा अफवा पसरविण्याचा धंदा बंद करावा,सरकार केवळ अफवा पसरवत असून, चांद्यापासून बांद्यापर्यंत जनता नाराज असल्याचा असा टोला लगावत मंत्र्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी सरकार बहि-याची भूमिका घेत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषद सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, सुनील तटकरे, शेकापचे भाई जयंत पाटील, हेमंत टकले, जोगेंद्र कवाडे, विजय वड्डेटीवार, आदी नेते उपस्थित होते.
शेतकर्यांना दिलेल्या कर्जमाफीनंतरही राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत त्यामुळे ही कर्जमाफी फसवी असल्याची सिद्ध झाल्याची टीका विखे पाटील करून सरसरकट कर्जमाफी देण्याची मागणी केली. राज्यातील मंत्र्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरण आम्ही उघड केली पण मुख्यमंत्र्याचे क्लिन चीट देण्याचे काम सुरूच असल्याचे सांगून काल कॉग्रेसने सिडको जमिनीचा उघड केलेला घोटाळा अधिवेशनात उपस्थित करून हा मुद्दा लावून धरणार असल्याचे विखे यांनी सांगितले. धनगर, मुस्लिम, मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि शिवस्मारकाबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा करणार्या या सरकारने आता अशा अफवा पसरविण्याचा धंदा बंद करावा असा टोला लगावत बहिर्याची भूमिका घेणार्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले. नाणार प्रकरणी विखे यांनी शिवसेनेवरही यावेळी टीकास्त्र सोडत या सर्व मुद्द्यावर उद्यापासून सुरू होणार्या अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले.
चौकट...
शिवसेनेवर बोचरी टीका...
राज्यसरकारच्या पाठीशी शिवसेनारूपी सावित्री ठामपणे उभी असल्यामुळेच हे सरकार टिकून आहे, अशी बोचरी टीका विरोधकांनी केली आहे.