तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचा हा कोणता न्याय : सभापती होन
कोपरगाव/ ता. प्रतिनिधी
समृद्धी महामार्गामध्ये कोपरगाव तालुक्यातील देर्डेकोहाळे, पोहेगाव बु., सोनेवाडी, चांदेकसारे, डाऊच खु, कोकमठाण, सडे, कान्हेगाव, भोजडे, धोत्रे, आदी गावातील ज्या शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत. यापैकी चांदेकसारे गावातील शेतकर्यांना जमिनीचा मोबदला हा इतर गावांपेक्षा अत्यल्प मिळालेला आहे. मात्र लोकप्रतिनिधींकडून, समृद्धी महामार्गामध्ये चांदेकसारे गावातील शेतकर्यांना न्याय मिळवून दिल्याचे सांगितले जात असल्याचे, पं. समितीच्या सभापती अनुसया होन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून आ. स्नेहलता कोल्हे यांनी प्रश्न विचारला आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील चांदेकसारे येथील बाजार ओटे कामाचा प्रस्ताव ग्रामपंचायतीचे तात्कालीन सरपंच मतीन शेख व त्यांच्या सहकारी सदस्यांनी 2017 मध्ये पणन महामंडळाकडे पाठविले होते. युवा नेते आशुतोष काळे यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे हे काम तातडीने मार्गी लागले. या कामाचा शुभारंभ युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला होता. हे काम पूर्ण होवून या कामाचे लोकार्पण आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले. त्यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गामध्ये चांदेकसारे गावातील ज्या शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या शेतकर्यांना न्याय मिळवून दिल्याचेे वक्तव्य केले. तो धागा पकडून सभापती अनुसया होन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून प्रश्न उपस्थित केला आहे.