भिगवणच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे मोफत वाटप
कुळधरण / प्रतिनिधी
भिगवण येथील श्रीराम ग्रामीण पतसंस्था व ओम क्रिएशन यांच्या वतीने बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना स्कुलबॅगचे मोफत वाटप करण्यात आले. भिगवणच्या लक्ष्मीनगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
खानोटा येथील श्रीराम पतसंस्थेचे संचालक रूपचंद गोळे,ओम क्रिएशनच्या संचालिका व तक्रार निवारण समितीच्या उपाध्यक्षा प्रियंका गुंदेचा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दै. लोकमंथनचे प्रतिनिधी प्रा. किरण जगताप व प्रा. संदीप भिसे यांच्या हस्ते स्कुलबॅगचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंचिकोरवे संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी केले.उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शिक्षणाने समृद्ध जीवन जगता येते. दारिद्रय संपविण्यासाठी शिक्षणाची गरज असते. विद्यार्थ्यांनी बिकट परिस्थितीवर मात करुन शिक्षण घ्यावे असे आवाहन प्रा. संदीप भिसे यांनी केले.प्रियांका गुंदेचा यांनी सामाजिक भावनेतून दरवर्षी हा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. यावेळी बालवाडी ते दहावीपर्यंतच्या 70 विद्यार्थ्यांना दप्तराचे वितरण करण्यात आले.
यावेळी कुंचीकोरवे संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार, उपाध्यक्ष संदीप गुंडाळे, सुरेश पवार, चंदर पवार, लक्ष्मी गुंडाळे, बापु पवार, दीपक पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन बापु पवार यांनी केले. गुरुआप्पा पवार यांनी आभार मानले.