अफवांवर विश्वास ठेवू नका : आ. थोरात
संगमनेर प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र ‘पोरधरी’ ही अफवा मोठया पसरली आहे. अशा अफवांमुळे राज्यात ठिकठिकाणी विनाकारण आठ जणांचा बळी गेला. पुरोगामी समाजासाठी हे अत्यंत दुर्दैवी आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन काँग्रेसचे नेते, माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
धुळे जिल्ह्यात राईनपाडा येथे अशाच अफवेने पाच जणांचा बळी घेतला. यावर बोलतांना आ. थोरात म्हणाले, सोशल मिडियामधून अशा खूप अफवा पसरविल्या जात आहे. धुळयात पाच जण आणि इतर ठिकाणी तीन जणांचा अफवेने बळी गेला. या अफवा आहेत, हे सामान्यांना पटवून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे. ग्रामीण भागात ‘पोरधरी’ ही अफवा मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तीवर संशय न घेता पूर्ण चौकशी करा.
आ. डॉ. तांबे म्हणाले, धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील हल्ला मनाला धक्का देणारा आहे. पुरोगामी व शांततामय महाराष्ट्रात अफवेतून जीव घेण्यापर्यंत मजल जाणे, हे अत्यंत दुर्देवी आहे. नागरिकांनी याबाबत जागरुकता बाळगावी. विशेषता तरुणांनी अतिउत्साहीपणा न दाखवता अशा व्यक्तींची पूर्ण चौकशी करावी. अथवा त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे. अशा जीवघेण्या हल्यातून निरपराध व्यक्तींचा प्राण तर जातोच, पण मारणार्यांना ही शिक्षा होते, हे ही लक्षात घ्यावे.