Breaking News

आ. कलानींचे सचिव आढळले मृतावस्थेत

नागपूर : विधीमंडळाच्या मान्सून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरातील आमदार निवास येथील खोली क्र. 46 मध्ये एक मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह मुंबईतील उल्हासनगरच्या आमदार ज्योती पप्पू कलानी यांचे स्वीय सचिव विनोद अग्रवाल यांचा असल्याची माहिती पुढे आली. अधिवेशनासाठी शासकीय यंत्रणा नागपुरात स्थलांतरित झाली असून राज्यातील आमदारांचे सचिव व इतर कर्मचारी शहरात डेरेदाखल झाले आहेत. मुंबईतील उल्हासनगर मतदारसंघाच्या आ. ज्योती क लानी यांचे सचिव विनोद अग्रवाल हे देखील नागपुरात पोहचले होते. सिव्हील लाईन्स परिसरातील आमदार निवासातल्या आ. रमेश लटके यांच्या खोली क्र. 46 मध्ये ते वास्तव्यास होते. दरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत अग्रवाल यांना झोपेतच हृदयविकाराचा धक्का आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात अधिक तपशिल मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर प्राप्त होईल असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान गेल्या काही वर्षातील अशाप्रकारची पहिलीच घटना नागपुरात घडली आहे. त्यामुळे आमदार निवास परिसरात चिंतेचे वातावरण आहे.