भारत दर्शनासाठी तालुक्यातून भाविक रवाना
अकोले तालुक्यातील 210 भाविक भारत दर्शनासाठी रवाना झाले आहेत. योगी केशवबाबा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गत अनेक वर्षांपासून भाविक भारत दर्शनासाठी जात आहेत. मंगळवारी सकाळी 8 वाजता अकोले आगाराच्या चार गाड्यांमधून हे भाविक पुण्याच्या दिशेने रवाना झाले. योगी केशवबाबा चौधरी यांच्या हस्ते नारळ फोडून प्रवासाला सुरुवात करण्यात आली. 12 दिवस चालणार्या या भारत दर्शनात इंदोर, ओंकारेश्वर, उज्जैन, महाकालेश्वर, वैष्णोदेवी, अमरनाथ, दिल्ली या ठिकाणी भाविक भेट देणार आहेत. तब्बल 15 वर्षांपासून योगी केशवबाबा चौधरी या धार्मिक यात्रांचे आयोजन करीत आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील अनेक आबालवृद्ध या यात्रेत सहभागी होवून परमेश्वराच्या चरणी लीन होत आहेत.दरवर्षी या भारत दर्शनाचे आयोजन करण्यात येते. अकोले तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिक या यात्रेत सहभागी झाले आहेत. योगी केशवबाबा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गणेश आवारी, नगरसेवक परशुराम शेळके, सुनिल गोरे, शरद पानसरे, रंजित खैरे, पो.कॉ. राहुल थोरात, ओम मंडलिक, बंडु गायकवाड, रोहिदास पानसरे, यौगेश पानसरे, हरिभाऊ नवले, ईश्वर वाकचौरे, महेश भराडे, कैलास वाकचौरे, प्रकाश फडताळे, गणेश सोनवणे, संतोष भालेराव आदी भाविक सहभागी झाले आहेत.