हिंसाचाराला राज्यसरकार जबाबदार : प्रकाश आंबेडकर
उस्मानाबाद : जाणीवपूर्वक मुल पळवणार्या टोळ्या कार्यरत आहेत, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. यावरून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम पद्धतशीरपणे चालू आहे. त्यातून हिंसाचार वाढला आहे, असे वातावरण निर्माण करण्यास शासनच जबाबदार असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला. ते उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ते आदिवासी ओबीसी आणि मुस्लीम समाजाशी संवाद साधण्यासाठी उस्मानाबाद येथे आले होते. ज्यांना आजवर सत्ता मिळाली नाही अशा समाजघटकांना एकत्र करून येणार्या 2019 च्या निवडणुकीत त्यांची मोट बांधण्यासाठी आंबेडकर राज्यभर फिरत आहेत. धुळे येथे नाथ डवरी समाजातील पाच जणांची हत्या झाली ही दुर्दैवी घटना आहे. देशात अफवा पसरवल्या जात आहेत, मुलांना पळवून नेणार्या टोळीच्या नावावर अशा घटना घडत आहेत. आसाम, उत्तरप्रदेशानंतर आता महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत. अशा पद्धतीने मारहाण करणे ही समाजातील विकृती आहे, असे मी समजतो. ती समाजात वाढायला लागली आहे. माणसाचे माणूसपण संपलेले आहे आणि सैतानांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हे सैतान निर्माण करण्यास शासन जबाबदार आहे, असेही आंबेडकर म्हणाले.