भाजप-पीडीपीमुळे जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग काँगे्रसचा भाजपावर आरोप
नवी दिल्ली - काँग्रेसने भाजप आणि पीपल्स डेमोक्रेटीक पार्टीवर (पीडीपी) जोरदार टीका केली आहे. भाजप आणि पीडीपीमुळे जम्मू-काश्मीर राज्यातील शांतता नष्ट झाली असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. गेल्या महिन्यात भाजपने पीडीपीला दिलेला पाठींबा काढून घेतला होता. त्यानंतर पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी पीडीपी आणि भाजपर टीका केली आहे. या दोन्ही पक्षांनी जम्मू काश्मीरमधील शांतता भंग केली आहे. या आघाडीने काय केले हे देशाला माहित असल्याचेही ते म्हणाले. येथे सातत्याने हिंसेच्या घटना घडत आहेत. यामध्ये नाहक तरुणांचे बळी जात आहेत. चार वर्षात मोदी सरकारने काश्मीरबद्दल काहीही धोरण आखले नसल्याचेही सुरजेवाला म्हणाले.