Breaking News

माऊंटन कॉर्प्सच्या निर्मितीत पंतप्रधानांना अपयश काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी यांची टीका


नवी दिल्ली : चीनसमोर गुडघे टेकत भारतीय लष्कराच्या माऊंटन कॉर्प्सची निर्मिती न केल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल यांनी एका वृत्तसंस्थेच्या अहवालाच्या आधारे ही टीका केली आहे. सुरक्षा कॅबिनेट समितीने माउंटन स्ट्रीक कॉर्प्सला 2013 मध्ये मंजुरी दिली आहे. चीन विरुद्ध उघडपणे सैन्य क्षमता मजबूत करण्यासाठी याची स्थापना करण्यात येणार आहे. या अहवालानुसार, आर्थिक अडचणीमुळे सरकार माऊंटन कॉर्प्सची निर्मिती करु शकले नाही. यावर्षी एप्रिलमध्ये झालेला वुहानमधला अनौपचारिक दौर्‍यालासुद्धा कोणताही अजेंडा नव्हता, असे राहुल यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या ’नो अजेंडा’ दौर्‍यामध्ये चीनचा छुपा अजेंडा होता, हे आता समोर येत आहे. इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे झाले आहे, की पंतप्रधान दुसर्‍या देशांसमोर अशाप्रकारे झुकले आहेत, अशी टीका राहुल यांनी केली.