Breaking News

चकमकीत नक्षली महिलेचा मृत्यू

गडचिरोली : पोलीस मदत केंद्र , ग्यारापत्ती अंतर्गत मौजा- टव्वे जंगल परिसरात दिनांक 14 ऑक्टोंबर 2017 रोजी नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना पोलीस नक्षलवाद्यांत सशस्त्र चकमक झाली. त्यात एकअनोळखी महिला नक्षल ठार झाली आहे. मृत पावलेल्या व्यक्तीचे, मृतदेहाचे मृत्यूच्या कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने , सदर प्रकरणात जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 अन्वये दंडाधिकारीय चौकशी करावयाची आहे. तरी सुचित करण्यात येते की , या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणार्‍या आणि चौकशी मध्ये भाग घेऊ इच्छीणार्‍यांनी खालील मुद्यांना अनुसरुन आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी , कुरखेडा येथील माझे न्यायालयात दिनांक 18 जूलै 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत किंवा कोणालाही यांची मा हिती असल्यास उप विभागीय दंडाधिकारी, कुरखेडा यांचे समक्ष शपथेवर निवेदन दिनांक 18 जूलै पर्यंत देऊ शकतात, असे उपविभागीय दंडाधिकारी कुरखेडा कळ वितात.