Breaking News

ऑनलाईन कर भरणार्‍यांची संख्या 52 टक्के

पुणे : शहरातील 5 लाख 90 हजार मिळकर धारकांनी 740 कोटीचा मिळकतकर भरला आहे. त्यात ऑनलाईन कर भरणार्‍यांची संख्या 52 टक्के असुन त्यातुन 400 क ोटीचा मिळकत कर जमा झाला आहे. आता मिळकत कर भरणार्‍याकडुन दरमहा दोन टक्के दंड आकारण्यात येणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेच्या विविध विभागातून अपेक्षीत उत्पन्न जमा न झाल्याने विकास कामांना कात्री लावण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली होती. हा अनुभव लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून पालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त मिळकतकर जमा करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चाल विले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मिळकत कराच्या वसुलीसाठी विविध पथके तयार करून अपघात विमा योजना आणि 5 ते 10 टक्के सूट या सारखे उपक्रम राबविले आहेत.