जॉन्सन अँड जॉन्सनला 32 हजार कोटींचा दंड बेबी पावडर वापरल्यानंतर कॅन्सर होत असल्याचा आरोप
नवी दिल्ली : ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ बेबी पावडर वापरल्यानंतर कॅन्सर होत असल्याचा आरोप जगभरातील 9 हजार महिलांनी करत, याविरोधात न्यायालयाकडे तक्रार दाखल केली होती. न्यायालयात 6 आठवडे चालल्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सनला दोषी ठरवत तब्बल 32 हजार कोटींचा दंड ठोठावण्यात आला. अमेरिकेतील सेंट लुइस कोर्टाने हा निकाला दिला. तसेच कोर्टाने 9 हजार पैकी 22 महिलांचा दावा खरा असल्याचे मानत या महिलांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
महिलांच्या तक्रारीत म्हटले आहे की, तब्बल एक दशक बेबी पावडरचा वापर केल्याने ही बाब कॅन्सरसाठी कारणीभूत ठरली. तपासणी केली तेव्हा जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरमध्ये एसबेस्टसचे तुकडे आढळले. अशा स्थितीत दीर्घकाळापर्यंत पावडरचा वापर केला गेला तर यामुळे नुकसान होते. दरम्यान, निर्णयापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया बरोबर नव्हती. सर्व पुराव्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे जॉन्सन अँड जॉन्सनने म्हटले आहे. या निर्णयामुळे आम्ही निराश झाला असून याविरोधात दाद मागणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. या प्रकरणात कोर्टाने म्हटले की, नामांकित कंपनी असल्याने जॉन्सन अँड जॉन्सनने उत्पादनाची गुणवत्ता राखणे आवश्यक होते. पण कंपनीने गुणवत्तेकडे दुर्लक्ष तर केलेच, शिवाय ग्राहकांना धोक्याबाबत सतर्क केेले नाही.’ पावडरमध्ये 1970 पासून अॅस्बेस्टॉसचा वापर होत असल्याचे कोर्टात स्पष्ट झाले. पण 2010 मध्ये यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने पावडरच्या सँपलमध्ये अॅस्बेस्टॉस आढळले नाही. कोर्टाच्या मते, या संस्थेने केलेली तपासणीची पद्धत योग्य नव्हती. याआधीही जॉन्सन अँड जॉन्सन उत्पादनाच्या गुणवत्तेला अनुसरून 4 खटल्यात जवळपास 20 अब्जचा दंड कंपनीला लागला आहे.