Breaking News

राजकीय नेत्यांचा पाठींबा मिळवण्यात प्रा. संदीप बेडसे आघाडीवर


नाशिक/प्रतिनिधी। विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीला माघारीची मुदत संपल्याने खरी रंगत भरली असून प्रत्यक्ष लढतीत असलेल्या 16 उमेदवारांपैकी टिडीएफचे अधिकृत उमेदवार प्रा. संदीप बेडसे यांना यांना शिक्षकांच्या विविध संघटना, शिक्षण संस्था आणि राजकीय नेत्यांचे पाठबळ लाभत असल्याने यंदा टिडीएफचा शिक्षक प्रतिनिधी विधानपरिषदेत गुरूजनांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी पाऊल ठेवेल, असे भाकीत वर्तवले जात आहे. या निवडणूकीत एकूण 25 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननी प्रक्रीयेत एक अर्ज बाद झाला तर सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 8 उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उरले आहेत. या सोळा उमेदवारांमध्ये शिक्षकांची एकमेव हक्काची संघटना असलेल्या टिडीएफने हाडाचा शिक्षक असलेले प्रा. संदीप बेडसे यांना उमेदवारी देऊन एक पाऊल पुढे टाकले होते.त्यातच प्रा. संदीप बेडसे यांना पाच जिल्ह्यातून स्थानिक शिक्षक नेतृत्व, मुख्याध्यापक संघ, विविध शिक्षक संघटना आणि विविध राजकीय पक्षाच्या स्थानिक नेतृत्वानेही प्रा.बेडसे यांच्या नावाला प्रथम पसंदी देत पाठींबा दर्शविल्याने निवडणूकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. प्रा. संदीप बेडसे स्वतः राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन आपल्या उमेदवारीची भुमिका पटवून देत आहे. याचाच एक भाग म्हणून संगमनेरचे आमदार आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पदवीधर मतदार संघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांची भेट घेऊन प्रा. बेडसे यांनी त्यांना आपली भुमिका समजावून पाठींबा मिळवला.