महिलांनी केली ‘पेमगिरी’ची पूजा; हजारो वटवृक्षांचे केले रोपण
संगमनेर प्रतिनिधी
दंडकारण्य अभियानांतर्गत तालुक्यात वटवृक्षारोपण सप्ताह मोठया उत्साहात सुरु आहे. वटसावित्री पोर्णिमेनिमित्त महिलांनी पेमगिरी येथील प्रसिध्द महाकाय वटवृक्षाची पूजा केली. यासह तालुक्यात विविध ठिकाणी २ हजार ५०० वटवृक्षारोपण केले.
वटसावित्री पोर्णिमेनिमित्त खांडगाव, निमज, विद्यानगर, धांदरफळ खु., धांदरफळ बु., सांगवी, निमगांव बु., निमगाव खु., पेमगिरी येथे प्रकल्प प्रमुख दुर्गा तांबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सभापती निशा कोकणे, शरयु देशमुख, मैथिली तांबे, निर्मला गुंजाळ, प्रमिला अभंग, सोनाली शिंदे, सुनिता कांदळकर, सुनिता जगनर, वैशाली कडनर, संध्या खरे आदींसह २५१ महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलतांना तांबे म्हणाल्या, भारतीय स्त्रीयांच्या जीवनात वटवृक्षाला विशेष महत्व आहे. चिरंतन सौभाग्यासाठी स्त्रीया वटवृक्षाची पुजा करतात. पुराणात वटवृक्षाला संसारवृक्षाचे प्रतिक मानले जाते. संस्कृतीत अत्यंत महत्वाचा असणारी वटपोर्णिमा हा महिलांचा आवडता सण आहे. वडाचे झाड अत्यंत औषधी व आरोग्यासाठी फलदायी आहे.
यावेळी सभापती निशा कोकणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मिलिंद कानवडे, सरपंच सोमनाथ गोडसे, संदीप डुबे, गणेश हासे, रमेश नेहे, दत्तु कोकणे आदी उपस्थित होते.