Breaking News

राजर्षि शाहू महाराज जयंती साजरी उत्साहात


।संगमनेर/प्रतिनिधी।
येथील संगमनेर महाविद्यालयात राजर्षि शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख, उपप्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, प्रबंधक संतोष फापाळे, साहेबराव तुपसुंदर, रोहिदस बर्डे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले, स्त्रीयांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे व त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी राजाज्ञा काढली. विधवा महिलांसाठी पुर्नविवाह कायदा आणला. त्यास कायदेशीर मान्यता दिली. त्यांनी अज्ञानी बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुले करुन दिली. शाहू महाराजांनी सामाजिक समतेची ज्योत प्रज्वलित केली. त्यांनी जातीय विषमता नष्ट करुन सर्वांना समान संधी उपलब्ध करुन दिली. 

प्रारंभी उपप्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन साहेबराव तुपसुंदर यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर सहकारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रबंधक संतोष फापाळे यांनी आभार मानले.