Breaking News

माजीमंत्री थोरातांची जि. प. शाळेला सदिच्छा भेट


तळेगांव दिघे / प्रतिनिधी।
पाऊस व वादळी वा-यामुळे तळेगांव दिघे गावापासून काही अंतरावर असलेल्या भागवतवाडी शिवारात असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेले. यामुळे शाळेच्या भिंतींचे मोठे नुकसान झाले. विद्यार्थ्यांच्या जिवितांची काळजी घेत शाळेच्या व्यवस्थापनाने जवळील मंदिरात आश्रय घेतला. दरम्यान, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या शाळेला नुकतीच सदिच्छा भेट दिली. 

उपसभापती नवनाथ अरगडे, सरपंच बाबासाहेब कांदळकर आदी यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी शाळेला सदिच्छा भेट देवून पाहणी केली. या शाळेच्या खोल्यांचा प्रश्न त्वरित सोडविण्यात येईल, अशी यावेळी ग्वाही दिली. या शाळेचे बांधकाम जिर्ण झाले आहे. अनेक भितींना तडे गेले आहेत. वादळी पावसामुळे शाळेच्या पत्र्ये उडाल्याने व भिंतींना चिरा पडल्या आहेत. त्यामुळे भागवतवाडी येथील विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय झाली आहे. तात्पुरता निवारा म्हणून विद्यार्थ्यांची जवळच्या हनुमान मंदिरात सोय झाली. मात्र दशर्नासाठी येणा-या भाविकांना यामुळे गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर शाळेचे बांधकाम त्वरित करून शाळेचा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी भागवतवाडीतील ग्रामस्थ करीत आहे.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, उपसरपंच अनिल कांदळकर, सचिन दिघे, रमेश दिघे, सोमनाथ भागवत, क्राॅग्रेस सेवा दलाचे उपाध्यक्ष नजीर शेख, केंद्रप्रमुख शिवाजी देशमुख आदी उपस्थित होते.