Breaking News

लहुजी शक्तिसेना कार्यकर्ता मेळावा निघोज कुंड येथे उत्साहात


निघोज / वार्ताहर ।
पारनेर तालुक्यातील निघोज येथे लहुजी शकितसेनेचा कार्यकर्ता मेळावा निघोज कुंड या पर्यटनस्थळी उत्साहात पार पडला. 
या कार्यक्रमासाठी लहुजी शक्तीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे उपस्थित होते. तालुकाध्यक्ष किसन साळवे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा अध्यक्षांच्या हस्ते पारनेर तालुका पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यामध्ये लहुजी शक्ती सेना पारनेर तालुका महिला आघाडी अध्यक्षा सारिका सुरेश साळवे, लहुजी शक्ती सेना पारनेर तालुका उपाध्यक्षपदी विशाल भास्कर साळवे, लहुजी शक्ती सेना पारनेर तालुका युवक अध्यक्ष सचिन पोपट आल्हाट, लहुजी शक्ती सेना पारनेर तालुका युवक उपाध्यक्ष युवराज शंकर अवचार, लहुजी शक्ती सेना पारनेर तालुका संपर्क प्रमुख विकास काळुराम साळवे, लहुजी शक्ती सेना पारनेर तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब सिताराम साळवे, सरचिटणीस शशिकांत गेणु कनिंगध्वज, निघोज शहर अध्यक्ष महेश बाबाजी साळवे आदीं मान्यवरांची निवड करण्यात आली. कार्यक्रमासाठी शशिकांत साळवे, संतोष कनिंगध्वज, अविनाश साळवे, दत्ता आल्हाट, कचरु साळवे, मोहन साळवे, अशोक वैरागर, रवी साळवे, सचिन पंचरास, शाम कनिंगध्वज, बबन बोरगे, पुष्पा वैरागर, सुनिता साळवे, जयश्री साळवे, पुनम साळवे, प्रतिक्षा साळवे, काळुराम साळवे, गोरक्ष साळवे, आदी मान्यवर उपस्थित होते. लहुजी शक्ती सेनेचे पारनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश वैरागर यांनी, तर आभार शशिकांत साळवे यांनी मानले.