Breaking News

गौरी लंकेश हत्या प्रकरणी सातार्‍यात छापे

हत्या केल्यानंतर मारेकर्‍यांनी सातार्‍यात आश्रय घेतल्याचे एसआयटीच्या तपासातून स्पष्ट 
सातारा : गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट सातारापर्यंत आले असून, याप्रकरणी बंगळूरच्या पोलिसांनी कोडोली येथे छापा टाकून सुमारे 7 तास कार्यवाही केली आहे. लंकेश हत्या प्रकरणातील काही संशयितांनी साता-यात काही काळ मुक्काम केल्याचे समोर येत असून, या घटनेने सातारा हादरला आहे. दरम्यान, नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर हे दुसरे कनेक्शन साता-यापर्यंत आल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे.दि. 5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी लंकेश यांची त्यांच्या घराजवळच अज्ञातांनी बेछूट गोळीबार करून हत्या केली होती. त्यांच्या हत्येनंतर पत्रकारिता क्षेत्रासह, बेंगलोर व संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. विचारवंतावर भ्याड हल्ला झालेली अलीकडील देशातील ही चौथी घटना आहेे. गेल्या चार वर्षांत दाभोलकर यांची पुणे, कॉ. पानसरे यांची कोल्हापूर, कलबुर्गी यांची कर्नाटक येथे तर 2017 मध्ये गौरी लंकेश यांची घराजवळच हत्या झालेली आहे. लंकेश यांना लक्ष्य करत त्यांची हत्या केल्यानंतर कर्नाटक सरकारपुढे मोठे आव्हान निर्माण झाले. बेंगलोर, क र्नाटक पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर गेल्या आठ दिवसांत याप्रकरणाच्या तपासात प्रगती झालेली आहे. पुणे येथून काही संशयितांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशीला सुरुवात करण्यात आली. या चौकशीत एकाने गौरी लंकेश यांची हत्या केल्यानंतर काही दिवसांसाठी सातारा येथे मुक्काम ठोकल्याचे समोर आले आहे. बेंगलोरचे एसआयटी पोलिस या प्रकरणाचा अत्यंत गोपनीय तपास करत असून लंकेश यांच्या हत्येच्या अनुषंगाने दि. 29 मे रोजी सातार्‍यात आले होते. सकाळी 10 वाजता हे पथक आल्यानंतर दुपारी पाच वाजेपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार कोडोली येथे बेंगलोर पोलिसांची एक ट्रॅव्हलर व्ह ॅनच आली होती. या पथकामध्ये बेंगलोरचे सुमारे 12 पोलिस अधिकारी कर्मचारी होते. पोलिसांनी कोडोली येथे एका घरावर छापा टाकल्यानंतर या घटनेमुळे परिसरात काहीकाळ गोंधळाचे वातावरण होते.
सातारा कनेक्शन...
गौरी लंकेश यांची हत्या केल्यानंतर त्यांचे मारेकर्‍यांनी सातार्‍यात काही दिवस मुक्काम ठोकल्याचे समोर आल्याने विचारवंताच्या हत्यचे सातारा कनेक्शन समोर आले आहे. याप्रकरणी बंगळूरच्या पोलिसांनी कोडोली येथे छापा टाकून सुमारे 7 तास कार्यवाही केली आहे. लंकेश हत्या प्रकरणातील काही संशयितांनी सातार्‍यात काही क ाळ मुक्काम केल्याचे समोर येत असून, या घटनेने सातारा हादरला आहे. दरम्यान, नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर हे दुसरे कनेक्शन सातार्‍यापर्यंत आल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे.