Breaking News

तहसीलदारांनी हातात झाडू घेवून स्वच्छता मोहीम केली सुरू


जामखेड / ता. प्रतिनिधी । 
येथील नवनिर्वाचित तहसीलदार विशाल नाईकवाडे स्वच्छतेबाबत अधिक जागरूक असल्याचे शहरातील ग्रामस्थांनी पाहिले. सकाळी 9 वाजता सुट्टीच्या दिवशीच झाडू हातात घेऊन त्यांनी स्वच्छता मोहीमेस सुरूवात केली. 
तहसील कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते, पहिल्या दिवशीच जेंव्हा नाईकवाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना परिसरातील घाण निदर्शनास पडली. त्यामुळे नायब तहसीलदार, दोन मंडलधिकारी कोतवाल सर्व तलाठी, पोलीस पाटील यांना बरोबर घेऊन प्रथमता तहसीलदार नाईकवाडे यांनी कामास सुरूवात केली. 
खोरे, फावडे, कुराड, टिकाव, खराटे, हातात घेऊन सर्व ठिकाणचे झाडे झुडपे तोडुन स्वच्छता केली. विशेष म्हणजे येथील कारागृहात जावून स्वच्छता केली. तेंव्हा कैदीही मनापासून आनंदी झाले. तसेच तहसीलसाठी 1102 झाडे लावण्याचा आदेश प्राप्त झाला आहे. त्यासाठी राजेवाडी ता. जामखेड गटामध्ये जेसीबी मशीनच्या सहाय्याने खड्डे घेतले आहेत. तेथे झाडे लावणार आहेत, तसेच जामखेड तहसील कारागृहासमोर 300 झाडे लावणार असल्याचे तहसीलदार नाईकवाडे यांनी सांगितले.