कोतुळेश्वर देवस्थानाच्या प्रश्नासंदर्भात कोतुळमध्ये विशेष ग्रामसभा
कोतुळ : ग्रामसभेमुळे लोकसहभागी नियोजनातुन अनेक गावांचा कायापालट झाला आहे. कोतुळ परिसरातील 33 गावांचे श्रध्दास्थान असलेल्या, कोतुळेश्वर देवस्थानच्या विकास आराखड्या संदर्भात आणि झालेल्या संरक्षक भिंती संदर्भात आज कोतुळ ग्रामपंचायतच्या आवारात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. माजी जि.प. उपाध्यक्ष सिताराम देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही ग्रामसभा पार पडली. कोतुळेश्वर देवस्थानचा विकास आणि नविन जागेत मंदीर स्थलांतर हा प्रमुख विषय ग्रामसभेचा राहिला. अनेक ग्रामस्थांनी यावेळी आपापली मते मांडली. भाजपचे कोतुळ विभागाचे अध्यक्ष सोमदास पवार यांनी कोतुळेश्वर मंदिराचा पर्यटन विकासात समावेश केला जावा अशी भूमिका मांडली, तर माजी जि.प. उपाध्यक्ष सिताराम देशमुख यांनी मा. मंत्री मधुकर पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा सर्वांगीन विकास करू असे सांगितले. कोतुळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कोते यांनी मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या कामासाठी 11 लाख रूपये यापुर्वीच दिलेले आहेत. पिंपळगाव खांड धरणामुळे कोतुळेश्वर मंदिर पाण्यात जात आहे. त्यातच यावर्षी धरणाचे राहिलेले 7 फुट भिंतीचे काम देखिल पुर्ण झाले आहे. म्हणुन मंदिरात पाणी शिरू नये म्हणुन संरक्शक भिंत गरजेची होती. म्हणुनच कोतुळेश्वर मंदीर संरक्षक भिंत आणि स्थलांतराचा विषय यावर ग्रामसभेत सखोल चर्चा झाली.
कोतुळेश्वर देवस्थानची सध्याची कार्यकारणी पुर्णपणे बरखास्त करावी आणि त्यावर नविन कार्यकारिणी नेमावी अशी सुचना पुढे आली. त्याच प्रमाणे कोतुळेश्वर मंदिराची जमीन आणि मंदीर तसेच स्मशानभुमी पाण्याची टाकी सर्व झाडे पत्रा शेड पिंपळगाव खांड धरण्यात बुडाल्याने शासनाकडुन जी नूकसान भरपाई मिळालेली आहे. ती अतिशय अल्पस्वरूपाची असुन शासनाने वाढीव नूकसान भरपाई द्यावी अशी मागणी, यावेळी सर्वांनीच केली. ग्रामसभेच्या चर्चेत भाऊ देशमुख, सयाजी पोखरकर, सयाजी देशमुख, दिलीप देशमुख, सोमदास पवार, गोपिनाथ देशमुख, रमेश देशमुख, राजेद्र देशमुख आदींनी सहभाग घेतला.
ग्रामसभेतील महत्वाचे मुद्दे
1. कोतुळेश्वर देवस्थान ट्रस्टचे संचालक मंडळ बरखास्त करावे.
2. सर्व समाजातील लोकांना ट्रस्टमध्ये संधी द्यावी.
3. नविन मंदिरासाठी जागा निश्चित करून, भव्य मंदिराची उभारणी करावी.
4. कोतुळेश्वर मंदिराच्या ट्रस्टच्या जमिनिचा निर्णय घ्यावा.
5. पिंपळगावखांड धरणाचे पाणी मंदिर परिसरात आल्याने पर्यटन विकासात याचा समावेश करण्यात यावा.