दहावीच्या परीक्षेत कुळधरणचे नूतन विद्यालय तालुक्यात अव्वल
कुळधरण : कर्जत तालुक्यातुन दहावीच्या परिक्षेसाठी 53 शाळेतील 3994 विद्यार्थी परीक्षेला बसले. तालुक्याचा सरासरी निकाल 92 टक्के लागला आहे.कुळधरणच्या नूतन मराठी विद्यालयातील विद्यार्थीनींनी तालुक्यातील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले. आकांक्षा भाऊसाहेब गुंड हिने 98.20 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर, पुर्वा गरुड हिने 97.20 टक्के गुण संपादन करुन द्वितीय क्रमांक पटकावला. कर्जतच्या महात्मा गांधी विद्यालयातील प्रणव भोसले याने 96.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. याही वर्षी मुलींनी आपले वर्चस्व कायम ठेवले. अनेक विद्यालयात पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावले.
कुळधरणच्या नुतन मराठी विद्यालयाचा निकाल 88.96 टक्के लागला.तालुक्यात विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शितल गुंड हिने 95.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक संपादन केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बापुसाहेब गुंड, कार्याध्यक्ष महेंद्र गुंड, जि.प.च्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, प्राचार्य सुर्यभान सुद्रिक, पर्यवेक्षक भागवत घालमे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाचा 86.71 टक्के लागला. दीप्ती शेटे हिने 88.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादन केला. संकेत कानगुडे याने 73.40 टक्के गुण मिळवुन द्वितीय तर ऋतुजा आगवण हिने 83.00 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. संस्थेचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, विश्वस्त डॉ. प्रवीण सप्तर्षी, सचिव मकरंद सप्तर्षी, प्राचार्य चंद्रकांत चेडे, वरिष्ठ लिपिक विकास कुलकर्णी तसेच सर्व कर्मचारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
कर्जतच्या श्री. अमरनाथ विद्यालयाचा निकाल शाळेचा निकाल 91.18 टक्के लागला. प्रथम- वैष्णवी काळे 95.60 टक्के, द्वितीय-श्रीकांत काळे 94.60 टक्के, तृतीय- प्रतिक काळे 94.40 टक्के गुण मिळवून यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन रवी पाटील, सचिव एल.के. लांगोरे, प्रभारी प्राचार्य प्रताप भैलुमे, कमल तोरडमल तसेच संस्था पदाधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
निमगाव डाकु येथील धाकोजी महाराज माध्यमिक विद्यालयाचा निकाल 82.85 टक्के लागला. विद्यालयात ॠषिकेश शेंडकर याने 88 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय- सोनल वायकर 83.00 टक्के, तृतीय- केशव खानवटे 82.80 टक्के.
कर्जतमधील 8 शाळा शंभर नंबरी
कर्जत तालुक्यातील 8 शाळांचा निकाल 100 टक्के लागला. यामध्ये- श्री नागेश्वर विद्यालय नागलवाडी, न्यु इंग्लिश स्कुल भोसे, भाऊसाहेब झरकर माध्यमिक निवासी शाळा मिरजगाव, श्रीरंग बापु विद्यालय शिंपोरा, न्यु इंग्लिश स्कुल रवळगाव, भैरवनाथ विद्यालय खांडवी, मुलांची शासकीय निवासी शाळा गायकरवाडी तसेच आणखी एका शाळेचा समावेश आहे.