Breaking News

अकोल्यातील दोन दारू दुकानांचे परवाने रद्द


अकोले : नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांच्या हद्दीतील दारू दुकाने सुरू करण्याची परवानगी न्यालयालयाने दिली. मात्र ग्रामपंचायत हद्दीतील दारू दुकाने याबाबत कुठलाही आदेश नसताना नवलेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील दोन दारू दुकाने सुरूच होती. याबाबत दारूबंदी आंदोलनाचे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी तक्रार केल्यानंतर अकोल्यातील हॉटेल पथिक व हॉटेल विजय या दोन दारू दुकानांचे दारू परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी हे आदेश दिले. दारूबंदी आंदोलनाचे वतीने हेरंब कुलकर्णी यांनी तक्रार थेट राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे केली होती, अकोले तालुका दारुबंदी आंदोलनाने केलेल्या तक्रारींनुसार जिल्हाधिकारी यांनी हे आदेश दिले. 1 एप्रिल ला बंद केलेली दारु दुकाने पुन्हा सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पण ते आदेश देताना फक्त नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांच्या हद्दीतील दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात योग्य अंतर व नियम पूर्तता करूनच परवाना सुरू करणे आवश्यक होते, अशी स्पष्ट नाराजी जिल्हाधिकारी यांनी नोंदवून पुढील आदेश येईपर्यंत तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री, आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे दारुबंदी आंदोलनाचे तालुकाध्यक्ष मंडळाचे संतोष मुतडक, निलेश तळेकर, संदीप दराडे, सुनील उगले, हेरंब कुलकर्णी यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर संगमनेर येथील उत्पादन शुल्क अधिकारी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान करून चुकीच्या पद्धतीने दुकान सुरू केल्याने, त्यांना निलंबित करावे व जिल्हा अधीक्षक याना 7 महिने सतत संपर्क करूनही लक्ष न दिल्याने त्यांचीही चौकशी करावी अशी मागणी आंदोलनाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या दोन्ही अधिकार्‍यांवर कारवाई होण्यासाठी आंदोलन पाठपुरावा करणार आहे. या दोन दुकानात दारू विक्री होणार नाही, याकडे अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे व शासनाने राज्यात अशाप्रकारे चुकीच्या परवानगी दिलेल्या, दुकानाची एक समिती नेमून चौकशी करावी व ती परवानगी देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी अकोले तालुका दारुबंदी आंदोलनाने केली आहे.