Breaking News

गरीबांच्या पक्या घरांचे स्वप्न लवकरच होणार पुर्ण


जामखेड : जामखेड नगरपरीषदेमार्फत केलेल्या सर्वेक्षणात एकुण चारही घटक मिळुन 3423 अर्ज प्राप्त झालेल्यांपैकी घटक क्रमांक चार मध्ये एकुण 1128 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 933 पात्र लाभार्थींचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) नगरपरिषदेच्या वतीने शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच गरीबांचे पक्क्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
पंतप्रधान आवास योजना (सर्वांसाठी घरे) या योजनेची शहरात अंलबजावणी सुरू आहे. जामखेड नगर परीषदेमार्फत केलेल्या सर्वेक्षणात एकुण 3423 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी घटक क्रमांक चारमध्ये एकुण 1128 अर्ज प्राप्त झाले. त्यामधील 933 पात्र लाभार्थींचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आज नगराध्यक्षा अर्चना राळेभात, उपनगराध्यक्ष महेश निमोणकर व मुख्याधिकारी विनायक औंधकर यांचेमार्फत शासनाला पाठवण्यात आला, या योजनेची शहरामध्ये 2 महीन्यांपुर्वी अमंलबजावणी सुरू झाली आहे. या घटकनिहाय अर्जाची कागदपत्रे तपासणी तसेच स्थळ पाहणी आणि जीओ टॅग करुन प्रक्रिया पुर्ण झालेली आहे. उर्वरित घटकांतर्गत प्राप्त अर्जाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. नगर परिषद व समन्वय संस्था नवनिर्माण महिला बहुद्देशीय संस्था अकोला या संस्थेने प्रक्रिया पूर्ण करुन ज्या अर्जदारांचे स्वतःचे खाली प्लॉट कींवा कच्चे घर आहे, अशा घटक क्रमांक चार मधील सर्व पात्र लाभार्थींचा 933 अर्जदारांचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे पाठविलेला आहे. या कामात नगरअध्यक्षा अर्चना राळेभात, मुख्याधिकारी विनायक औंधकर, सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी जातीने लक्ष घालून हा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यामध्ये सहकार्य केले. पुढील दोन महिन्यात या प्रस्तावाला शासनाची मंजूरी मिळण्याची शक्यता असुन, जामखेडमधील ज्या कुटुंबाचे कच्चे घर आहे अशा कुटुंबांचे स्वतःचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.