मेस्सीला अखेरची संधी
मुंबई
रशियामध्ये रंगणाऱ्या फ़ुटबाँल वर्ल्डकपने चांगलाच फिवर चढला असून त्यावर अनेक चर्चा, भाकिते रंगली आहेत. बऱ्याचश्या खेळाडूंचा हा अंतिम सामना असू शकतो. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचाही यात समावेश केलाजाणार आहे. अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. त्यामुळे संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी तो सर्वोत्तम प्रयत्न करेल. 'ड' गटातून अर्जेंटिनाचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित मानला जातआहे. मात्र, या संघाला क्रोएशिया आणि नायजेरियाकडून चांगले आव्हान मिळू शकते. या गटात आइसलँड हा नवखा संघ आहे. २०१४च्या उपविजेत्या अर्जेंटिना संघाची या वेळीही जेतेपदाच्या शर्यतीत गणना केली जातआहे.