Breaking News

दहावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल 89.41 टक्के


महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.  राज्याचा निकाल यंदा 89.41 टक्के लागला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 91.97 टक्के इतका लागला आहे. तर 87.27 टक्के मुलं पास झाली
कोकण विभागाने बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 96 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 85.97 टक्के इतका लागला.

विद्यार्थ्यांना दुपारी 1 वा. बोर्डाच्या http://www.mahresult.nic.in/ या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.

SMS सेवेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. यासाठी 57766 या नंबरवर MHSSC<space><seat no> एसएमएस करायचा आहे.