Breaking News

भारतातही फुटबॉल फिव्हर; सर्व सामने ‘हाऊसफुल्ल’


मुंबई प्रतिनिधी

भारतात क्रिकेट या खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. क्रिकेटने जनमानसात आपले स्थान पक्के केले आहे. परंतु आता क्रिकेटबरोबरच कबड्डी, फूटबॉल, हॉकी, बॅडमिंटन या खेळांनाही भारतीयांची पसंती मिळत आहे. फिफा वर्ल्ड कप मुळे सध्या जगभरात फुटबॉल फिव्हर चढला आहे. मात्र भारतातील फुटबॉल फिव्हरचे कारण आहे भारतीय संघाची इंटनकॉन्टिनेंटल फुटबॉल चषक स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी.

मुंबईमध्ये सुरु असलेल्या इंटनकॉन्टिनेंटल फुटबॉल चषक स्पर्धेत काल न्यूझीलंड विरुद्ध भारताचा सामना होणार झाला. यातही परीक्षकांची गर्दी दिसून आली. या स्पर्धेत भारताने एकूण २ सामने खेळले असून दोनहीसामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात भारताने चायनीज तैपई संघावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात भारताने केनियाचा ३-० असा धुव्वा उडवला. त्यामुळे भारताची अंतिमसामन्यातील स्थान जवळपास निश्चित आहे.

कालच्या सामन्याची संपूर्ण तिकिटे विकली गेली. भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने भारतीय प्रेक्षकांना सामना पाहायला आवाहन केले होते. या आवाहनाला दणक्यात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.केनियाविरुद्धच्या सामन्यासाठी स्टेडियम ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. तसेच भारताचे स्थान निश्चित मानल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याची पूर्ण तिकिटेही विकली गेली आहेत.१० जूनला अंतिम सामना खेळण्यात येणारआहे. सध्या गुणांच्या तक्त्यानुसार, भारत २ विजयांसह अव्वल आहे. तर केनिया २ पैकी १ सामना जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड आणि चायनीज तैपेई संघ १ सामना गमावून ० गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणिचौथ्या स्थानी आहे.