रशिया अखेरपर्यंत पराजितच
मॉस्को
फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना रशिया फुटबॉल संघाला विजय मिळवण्यात अद्यापही यश आलेले नाही. आतापर्यंतझालेल्या ८ पैकी ७ सामन्यात पराभव आणि एका सामन्यात बरोबरी अश्या अवस्थेमध्ये रशिया फुटबॉल टीम आहे. अखेरच्या सराव सामन्यात तुर्कीने रशियाला१-१ असे बरोबरीत रोखले.
रशियाने या सामन्यात आक्रमक सुरुवात केली होती. लढतीच्या ३५व्या मिनिटाला अलेक्सांडर सॅमेदोवने गोल करून रशियाला आघाडी मिळवून दिली होती. मध्यंतराला ही आघाडी रशियाने कायम राखली होती. यानंतर ५९व्या मिनिटाला तुर्कीच्या युनूस मालीने गोल करून बरोबरी साधली. ही बरोबरी शेवटपर्यंत कायमराहिली. मागील आठ महिन्यांपासून रशियाला विजय मिळवता आलेला नाही. ऑगस्ट २०१६ पासून स्टॅनिस्लाव चेरचेसोव यांनी रशिया संघाची सूत्रे स्वीकारलीआहे. तेव्हापासून आतापर्यंत रशियाने पाच विजय मिळवले असून, सहा लढती बरोबरीत सोडविल्या आहेत. त्याचबरोबर नऊ लढतींत रशियाला पराभव स्वीकारावालागला आहे. वर्ल्डकप स्पर्धेत यजमान रशियाचा अ गटात समावेश असून, रशियाची सलामीची लढत १४ जूनला सौदी अरेबियाविरुद्ध होईल.