कायदा-सुव्यवस्था बिघडविणा-यावर कारवाई : पो. नि. लोखंडे
कोपरगाव / शहर प्रतिनिधी
तालूका हा नक्कीच आदर्श असा तालुका आहे. याठिकाणी पूर्वी काम करण्याची संधी मिळाली होती. कोपरगाव तालूका ग्रामीण पोलीस स्टेशनचे काम करतांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. मात्र विनाकारण कोणी कायदा-व्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी केले.
पोलीस निरीक्षक लोखंडे यांचा कोपरगाव तालूका मराठी पत्रकार संघाच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गुन्हेगार प्रवृत्तींना जरब बसणार आहे. कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणी अवैध व्यवसाय करत असेल तर नागरिकांनी पोलीसांशी संपर्क साधावा. त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील.
यावेळी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण गव्हाणे, उपाध्यक्ष शैलेश शिंदे, कार्याध्यक्ष युसुफ रंगरेज, रोहित टेके, लक्ष्मण वावरे, सोमनाथ सोनपसारे, लक्ष्मण जावळे, हेमचंद्र भवर, सिध्दार्थ मेहरखांब, सचिव संतोष जाधव, काकासाहेब खर्डे, नितीन जाधव, अक्षय खरात, शिवाजी जाधव, हाफीज शेख, दिलीप दुशिंग, योगेश डोखे, मोबीन शेख आदी पत्रकार उपस्थित होते.