राष्ट्रीय महामार्ग लवकरच येणार अस्तित्वात : आ. मुरकुटे
अहमदनगर / प्रतिनिधी
देशासह राज्यातील विविध ठिकाणच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांना जोडणारा आणि केंद्रीय रस्ते बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला नेवासे तालुक्यातील २६ किलोमीटरचा महत्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्ग लवकरच अस्तित्वात येणार आहे, अशी माहिती आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी ‘दैनिक लोकमंथन’शी बोलतांना दिली.
ते म्हणाले, या राष्ट्रीय महामार्गामुळे शिर्डी, शनिशिंगणापूर, देवगड, नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह स्थानिक ग्रामस्थांची महामार्गामुळे चांगली सोया होणार आहे. शनिशिंगणापूरला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत यामुळे कमालीची वाढ होणार आहे. २६ किलोमीटरच्या या महामार्गासाठी १११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, या महामार्गाचा पहिला सर्वे पूर्ण झाला असून आणखी दोनदा सर्वे होणार आहे. साधारणतः दीड ते दोन महिन्यानंतर प्रत्यक्षात या महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या महामार्गाचे संपूर्णतः काँक्रीटीकरण केले जाणार असून त्यासाठी सध्याच्या रस्त्यावरचे डांबर पूर्णपणे काढले जाणार असल्याचे अभियंता लोखंडे यांनी सांगितले. ते म्हणाले, औरंगाबाद महामार्गालगतच्या शनिशिंगणापूर देवस्थानच्या कमानीपासून राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड महामार्गालगतच्या या देवस्थानच्या कमानीपर्यंत हा काँकिटचा राष्ट्रीय महामार्ग होणार आहे.
या महामार्गाच्या कामापूर्वी संभाव्य महामार्गालगतच्या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. हा महामार्ग मध्यभागापासून दोन्ही बाजूने ३० असा ६० फूट होणार आहे. या महामार्गाच्या कामामुळे दळणवळणाच्या समस्येला पूर्णविराम मिळणार आहे. सध्याचा सोनई ते राहुरी हा रस्ता अरुंद असून या रस्त्यावर अनेकदा किरकोळ अपघात होत आहेत. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या समस्या राहणार नाहीत. आगामी वर्षभरात या महामार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
चौकट
लाखोंचा खर्च जाणार वाया
भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिन आयेंगे’ अशी आश्वासनात्मक हाक दिली होती. तिचा प्रत्यय या महामार्गाच्या कामातून मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्वीच्या सरकारने या वर्षभर रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि डांबरीकरण करण्याची तसदी घेतली नाही. आ. मुरकुटेंच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण झाले. मात्र काँक्रिटीकरणाच्या या कामामुळे लाखोंचा तो खर्च आता वाया जाणार आहे.