गौतम पब्लिक स्कूलचा निकाल १०० %
कोपरगाव ता. प्रतिनिधी
राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आज {दि. ८ } जाहीर झाला. यामध्ये गौतम पब्लिक स्कूलचा निकाल यावर्षीदेखील १०० % लागला.
गौतम पब्लिक स्कूलचे एकूण १३४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यामध्ये विशेष प्राविण्यासह ७५ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये ४९ व द्वितीय श्रेणी मध्ये १० असे एकूण १३४ विदयार्थी उत्तीर्ण झाले. शाळेमध्ये प्रथम क्रमांक अनुक्रमे अनिकेत प्रकाश कदम (रा. गौतमनगर) आणि आरती साहेबराव वाबळे (रा. शहजापूर) यांनी पटकाविला. या परीक्षेत श्रेयस शरद शिंदे (कोळपेवाडी), अनिकेत भालचंद्र येवला (सटाना, जि. नाशिक) समृद्धी गोकुळदास चांदगुडे आदी विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, बीजगणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयांमध्ये प्राविण्य मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्याना प्राचार्य नूर शेख, सुपरवायझर ज्योती शेलार, मीना शिंदे, विषय शिक्षिका सुनिता आवारे, सुनिता कुलकर्णी, कविता चव्हाण, वैशाली उंडे, नसीर पठाण, अशोक होन, योगेश काळे, शहाजी ढोणे, प्रकाश भुजबळ यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन माजी आ. अशोक काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, विश्वस्त आशुतोष काळे, मानद सचिव चैताली काळे, सहसचिव स्नेहल शिंदे आदींसह संस्थेचे संचालकमंडळ, शाळेचे प्राचार्य, शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.