Breaking News

ऑलिंपिक पदकविजेत्यांना निवृत्ती वेतन


नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंच्याबाबतीत महत्वपूर्ण निर्णय घेत निवृत्ती पेन्शनमध्ये वाढ केली आहे.ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना यापुढेमासिक २० हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पॅरालिंपिकमधील पदक विजेत्यांनाही हीच रक्कम निवृत्ती वेतन म्हणूनमिळणार आहे.

जागतिक स्पर्धा किंवा आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना मासिक १६ हजार रुपये, तर रौप्य व ब्राँझपदक विजेत्यांना अनुक्रमे १४ हजार आणि १२हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. सुधारित धोरणानुसार क्रीडापटू हा स्पर्धात्मक खेळातून निवृत्त झालेला असावा आणि निवृत्तीवेतनासाठी अर्ज करताना त्यानेवयाची ३० वर्षे पूर्ण केलेली असावीत. सध्या जे खेळाडू निवृत्ती वेतन घेत आहेत, त्यांच्या निवृत्तीवेतनाची सुधारित रक्कम १ एप्रिल २०१८पासून मिळू शकेल.