दहावीच्या परीक्षेत ‘प्रवरा’चे नेत्रदीपक यश,यंदाही मुलीच आघाडीवर
प्रवरानगर प्रतिनिधी
येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या राहता, राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविण्यात मुलीच आघाडीवर असल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे.
लोणीच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर या शाळेच्या ऋतुजा गणेश मोरे या विद्यार्थिनीला ९९ टक्के गुण मिळाले. प्रवरा पब्लिक स्कूलचा युवराज बाळासाहेब अंबाडे याला ९८ टक्के, आकांक्षा रामदास खर्डे हिला ९७ टक्के, प्रवरा पब्लिक स्कूलचा अनिकेत पंजाबराव बिलारी यालादेखील ९७ टक्के गुण मिळाले आहेत. प्रवरा कन्या विद्या मंदिरची अपूर्वा राधाकिसन कोर्हाळे हिला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. पुणे बोर्डात तिने हा इतिहास घडविला आहे.
लोणी येथील प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल् या शाळेचा निकाल १०० टक्के लागला. त्याचप्रमाणे प्रवरा हायस्कूल, कोल्हार १०० टक्के, प्रवरा पब्लिक स्कूल , प्रवरानगर १०० टक्के, प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल, प्रवरानगर ९८ टक्के, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल, लोणी १०० टक्के, प्रवरा माध्यमिक विद्यालय, भुतेटाकळी ९६.३० टक्के, प्रवरा माध्यमिक विद्यालय, सोनेवाडी ९५.२४ टक्के, प्रवरा माध्यमिक विद्यालय, आडगाव १०० टक्के, श्री रामेश्वर विद्यालय, चणेगाव ९४.४४ टक्के, प्रवरा माध्यमिक विद्यालय, उंबरीबाळापूर ९३.३३ टक्के, प्रवरा माध्यमिक विद्यालय, कासारवाडी ९६ टक्के, प्रवरा कन्या विद्या मंदिर, लोणी १०० टक्के, प्रवरा माध्यमिक विद्यालय, झरेकाठी ९३.९४ टक्के, ज्ञानामृत माध्यमिक विद्यालय, रामपूरवाडी ९७.९६ टक्के आदी शाळांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले.
राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर, प्रा. विजय आहेर, प्रवरा कन्याच्या प्राचार्या लीलावती सरोदे, प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य सयाराम शेळके, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष सदस्य, सर्व मुख्याद्यापक, शिक्षक-शिक्षिकांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.