Breaking News

सुपा परिसरातील शाळांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम


सुपा / प्रतिनिधी । 
पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील शाळांनी दहावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये बाबुर्डी येथिल रोकडेश्‍वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. मागील आठ वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी विद्यालयाने कायम राखली.
यामध्ये अनिकेत अरुण देठे 78 टक्के गुण मिळवून प्रथम, महेश रामदास जगताप 65 टक्के द्वितीय तर शेखर सुनिल दिवटे 52 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. तर बाबुर्डीच्या विद्यमान सरपंच आशा दिवटे यांचा मुलगा ओंकार सुभाष दिवटे याने 91 टक्के गुण मिळवून यश मिळविले.
भोयरे गांगर्डा येथिल श्री दत्त विद्यालयाचा निकाल 94.74 टक्के लागला. यामध्ये राजरत्न सिद्धार्थ नरवडे 83 टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय प्रविण राजू धुळे 75.20 टक्के, तर तृतीय तुषार अर्जून पवार 74 टक्के गुण मिळवून यश संपादन केले.
सुपा येथिल न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल 92.25 टक्के लागला. यामध्ये आरती सुदाम जाधव 96.20 टक्के गुण मिळवून प्रथम, तर ऋतुजा मनोहर काळोखे 96 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर मंगल दत्तात्रय दिवटे हिने 95.80 टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांक संपादन केला.
श्री बाळानंद स्वामी विद्यालय वाघुंडेचा निकाल 93 टक्के लागला असून, यामध्ये प्रियंका रामचंद्र रासकर 90 टक्के गुण मिळवून प्रथम, तर द्वितीय रुपाली विठ्ठल गाडिलकर 83 टक्के, तसेच तृतीय प्रियंका बबन मगर 82.20 टक्के गुण, या तिनही मुलींचे (सेमी इंग्लिश) मुलींचे विद्यालय, संस्था, तसेच वाघुंडे खुर्द, वाघुंडे बुद्रूक, संस्था प्रमुख सरपंच संदिप मगर, मुख्याध्यापक, एन.आर शेख व पालकांनी अभिनंदन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.