राष्ट्रीय कबड्डीपटू अशोक कोंढरे यांचे निधन
पुणे, दि. 07, जून - राष्ट्रीय कबड्डीपटू अशोक कोंढरे (69) यांचे आज पुण्यातील रुबी हॉल येथे निधन झाले. भारताबाहेर जपान, बांगलादेश येथे कबड्डी खेळ पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी अनेक वर्ष भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले. त्यांच्या खेळातील योगदानाबद्दल त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.