शहरामध्ये पहिल्याच पावसाने महानगरपालिकेचे पितळ उघडे रस्त्यांची लागली वाट मध्यवर्ती भागासह उपनगरात पाण्याचे साचले तळे
शहरासह जिल्हयात मंगळवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. यातुन महानगरपालिकेने केलेले कामांचे पितळ उघडले पडले आहे. तर दुसरी बाजुला महावितरण कंपनीचेही पितळ उघडे पडले आहे. यातुन आता सर्वांना एक प्रकारे यांच्या कामकाजाची पुरती माहिती झाली असून यंदाचा पावसाळा कठीन जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
जिल्हयात वादळी वार्यासह मान्सुनपुर्व पावसाने हजेरी लावली. यातुन एक प्रकारे या पावसाचे महाविरण आणि मनपाची चाचणी परिक्षाच घेतली आहे. मात्र, चाचणी परिक्षेत दोन्ही विभाग पुरते अपयशी ठरले आहे. वार्या वावधनाने महाविरणचे कामे काय झाले याची प्रचिती दिली तर दुसर्या बाजुला मनपाने केलेले रस्ते किती सुस्थित केले आहेत याचीही प्रतिची सर्वांना आली आहे. यातुन एक मात्र झाले आहे की विरोधकांना यंदा आंदोन करण्यासठी मनपाने एक प्रकारे संधीच दिली आहे. नालेसफाई न झाल्याने विविध भागात पाणी रस्त्यावरुनच वाहत होते. तर ज्या ठिकाणी पंधरा दिवसात रस्त्याला पॅचिंग केली आहे ते पुर्णपणे उखडले आहेत.
नगर शहरासह जिल्हयात मंगळवारी रात्री आणि बुधवारी वादळी वार्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. नगर शहरामध्ये रस्त्यांवर खड्डे पडल्याने पहिल्याच पावसात महानगरपालिकेचे पितळ उघडे पडले आहे. शहरातील जोरदार पावसाच्या थैमानाने सर्वत्र पाण्याचे साम्राज्य होते तर दुसर्या बाजुला मनपाने केलेल्या अनेक कामांचे तिन तेरा वाजले आहे. तसेच महाविरणाने पावसाळ्या अगोदर ज्या प्रमाणात कामे करणे गरजचे होते ते ही झाले नसल्याचे आता समोर आले आहे. शहरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील काही भागात लगेच विज गुल होण्याचा प्रकार घडला तर विजवितरणाच्या कारभाराचा मनस्ताप पाणी न आल्याने महिला वर्गाला जास्त प्रमाणात सहन करावा लागला आहे.
सत्ताधार्यांनी केली विरोधकांच्या आंदोलनाची सोय
लवकरच पावसाला सुरवत होणार असल्याचे वेधशाळेने सांगीतले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरतील विविध कामे मार्गी लावण्यात आले आहेत. यामध्ये गटारीचे आणि रस्त्याचे कामे करण्यात आली असली तरी सध्या रस्त्यांचा प्रश्न पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा उभा ठाकणार असल्याचे चित्र असून सत्ताधार्यांनी विरोधकांना आयती आंदोलन करणयाची सोय केली की काय असाच प्रश्न पडला आहे.
कामांची चौकशी व्हावी
पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर तातडीने कामे मार्गी लागावीत अशा सुचना असताना देखील मनपाने कोठे कोठे काम केले आहे याचा पत्ताच लागत नाही. सत्ताधारी उपनगरातील नगरसेवक यांनीही मागील पंधरवाड्यात गटारांचे कामे तातडीने करावे अशी मागणी केल्याने नालेसफाईचे कामे नेमके कोणत्या कोणत्या प्रभागात झाले याचीही चौकशी व्हावी अशी मागणी पुढे येत आहे.
पाण्याचा प्रश्न जटील
शहरातील पहिल्याच पावसात मनपाचे कामांचे पितळ उघडले पडले आहे. मनपा बरोबरच महावितरणनेही अनेक कामे मार्गी लावले असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मान्सुनपुर्व पावसाने पहिल्याच पावसात सर्व काही ठीक नसल्याचे पहायला मिळाले आहे. यातुन महावितरणच्या कारभाराने नगरकरांवर मात्र पाणी असुनही पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.