Breaking News

छावणी मंडळाला पालिकेचा दर्जा मिळावा आर.आर पिल्ले यांची मागणी

राज्य मंत्री मंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत कॅन्टोन्मेंट बोर्डाला राज्याचा निधी देण्याबद्दल प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मा.उपाध्यक्ष आर.आर.पिल्ले यांनी शासनाचे आभार मानले परंतु मूळ मागणीतील एक घटक मंजूर केला पण त्याचा नागरिकांना प्रत्यक्ष काही फायदा होणार नाही 

परंतु मूळ प्रस्ताव कॅन्टोन्मेंट बोर्डाला नगरपालिकेचा दर्जा देणे बाबत आहे त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाला राज्य शासनाकडून निधी मिळण्याबात होता त्यासाठी भिंगार काँग्रेस कमिटी गेली 40 वर्षे प्रयत्न करून पाठपुरावा आजतागायत करत आहे त्यामुळे शासनाने कॅन्टोन्मेंट बोर्डाला नगरपालिकेचा दर्जा द्यावा हि पूर्ण राज्याची मागणी आहे व तो मिळावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन आम्ही न पा मागणी केली त्यांनी 16 मे2018 लाच मुख्यमंत्री याना पत्र लिहून मागणी केली पण 6 जूनला ती पूर्ण न करता त्यातील एक केली असे मा उपाध्यक्ष आर आर पिल्ले यांनी सांगितले.शहराला नगरपालिकेचा व खेडेगावांना ग्रामीण दर्जा आहे परंतु मध्यप्रदेश सोडून भारतात सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाला शहर व ग्रामीण दर्जा नाही, सन 2006 साली केंद्र सरकारने कॅन्टोन्मेंट बोर्डाला राज्य शासनाने दर्जा दिला आहे व तो राज्य शासनाकडे पाठविला आहे.