३६ मिनिटात १६४५ कोटींची कमाई
न्यूयार्क
फोर्ब्सने बुधवारी हायेस्ट पेड स्टार खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली असून या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूची कमाई अवाक करणारी आहे. अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉईड मेवेदर याने २०१७ मध्ये तब्बल १९१३.३कोटींची कमाई केली असून त्यातील १६०५ कोटी रुपये त्याने अवघ्या ३६ मिनिटात कमावले आहेत. २७ ऑगस्ट २०१७ ला लास वेगास येथे झालेल्या हाय प्रोफाइल सामन्यात मेवेदरने कॉनोर मेकग्रेगर याला अवघ्या ३६मिनिटात पराभूत केले. या सामन्यासाठी ६०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ४ हजार कोटी रु. पणाला लागले होते. मेवेदरने हा सामना जिंकून १६४५ कोटीं रुपये कमावले. २२० देशात या लढाईचे थेट प्रक्षेपण केले गेले होते. या पूर्वीएका वर्षात १० आकडी कमाई करण्याची कामगिरी बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन आणि गोल्फपटू टायगर वूड्स यांनी बजावली होती त्या यादीत आता मेवेदर समाविष्ट झाला आहे.