रमजान ईदनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, परमेश्वराची इच्छा, त्याचे प्रेम, त्याचे अभयदान, त्याचा स्नेह (करुणा) व त्याचा दैवी प्रकाश या सर्व गोष्टींचा समावेशक असलेल्या रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर येणारा रमजान ईद हा सण आनंद आणि उत्साहाचा सण आहे. माणसा-माणसांतील प्रेम व्यक्त करणाऱ्या या सणाच्या माध्यमातून समाजातील बंधुभाव वाढीस लागेल. या सणाच्या निमित्ताने वंचित-उपेक्षितांना सहाय्य करून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होणारा प्रयत्न निश्चितच सामाजिकता जोपासणारा आहे.
