बिहाणी विद्यालयाचा भूषण देशपांडे प्रथम
राहुरी ता. प्रतिनिधी : येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्या मंदिर प्रशाला या शाळेचा निकाल ८३. ६९ लागला. भूषण महेश देशपांडे याने ९७.४ टक्के गुण मिळवून राहुरी केंद्रात येण्याचा मान मिळविला.
या विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली गेली. विद्यालयातून परीक्षेसाठी ३१९ विद्यार्थी बसले होते. त्यामधून २६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातील अक्षय दादासाहेब बाचकर, ऐश्वर्या धनंजय तहकीक, प्रणव सुरेश बोबडे, सागर तुकाराम केंगार आदी विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. संस्थेच्या अध्यक्षा प्रभावती बिहाणी, सचिव मनोज बिहाणी, सहसचिव अनुप बिहाणी, मुख्याध्यापक नामदेव खराडे, उपमुख्यध्यपिका साधना सातभाई, पर्यवेक्षिका मंजिरी देशपांडे, पारस जैन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.