पाणी योजनेचा पुरवठा दोन दिवसांत सुरळीत : गाडे
राहुरी ता. प्रतिनिधी : तालुक्यातील बारागाव नांदूर आणि इतर पंधरा गाव पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊसच्या तळाशी साठलेला गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे, अशी माहिती जि. प. सदस्य शिवाजी गाडे यांनी दिली.
बारागाव नांदूरसह राहुरी खुर्द, तमनर आखाडा, देसवंडी, तांदूळवाडी, कोंढवड, आरडगाव, शिलेगाव, मानोरी, वळण, पिंप्री चंडकापूर, मांजरी आदी गावांना या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. योजनेच्या पंपहाऊसच्या तळाशी मोठ्या प्रमाणात गाळ साठला गेल्याने धरणातून पाणी उपसा करण्यास अडचण निर्माण झाली होती. या ठिकाणी इतर कोणत्याही यंत्रणेने काम करणे शक्य नसल्याने मजूर गाळ उपसण्याचे काम करत आहेत. अनेक अडचणी असल्या तरी युध्द पातळीवर काम सुरु असल्याचे गाडे यांनी सांगितले.
यावेळी डिग्रसचे सरपंच पोपट बर्डे, उपसरपंच अनिल शिंदे, संदीप ओहोळ, ज्ञानेश्वर भिंगारदे, सिताराम जाधव, संजय पवार, कुंडलिक गावडे, राजूभाऊ बेल्हेकर, शिवाजी पवार, पत्रकार विनित धसाळ आदी उपस्थित होते.