Breaking News

विश्वस्तरीय योगशिक्षक परीक्षेत नगरमधील सौ.प्रमिला अग्रवाल,डॉ.सुवर्णा चोभे,सौ.दीपाली गांधी,सौ.नेहा विश्वासराव विशेष श्रेणीत उत्तीर्ण


नगर- केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालया व भारतीय गुणवत्ता मंडळ (क्यू.सी.आय.) तर्फे घेण्यात आलेल्या विश्वस्तरिय योगशिक्षक परीक्षेत नगरच्या सौ.प्रमिला अग्रवाल,डॉ.सुवर्णा चोभे,सौ.दीपाली गांधी,सौ.नेहा विश्वासराव विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.या बद्दल त्यांचे सर्वत्र आभिनंदन होत आहे.

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे भारतीय गुणवत्ता मंडळातर्फे योगाच्या प्रचारासाठी सर्वसमावेशक असा हा शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यास जगभरात मान्यताप्राप्त असून उत्तीर्ण होणाऱ्या योगशिक्षकांना अधिकृत शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येते.त्याच बरोबर शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरही या योगशिकांची नोंद असते.

हि परिक्षा उतीर्ण योगशिक्षक स्वत:चे योग क्लासेस घेऊ शकतात. त्यांना विविध संस्था,शाळा मध्ये नोकरी प्राप्त होऊ शकते.तसेच योगाच्या प्रचारासाठी केंद्र शासनातर्फे परदेशात पाठविताना या योगशिक्षकांना प्रथम प्राधान्य दिले जाते. या सर्व उत्तीर्ण योग शिक्षकाना योग विद्या फौंडेशनचे संस्थापक श्री.सुरेश सावंत सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.