Breaking News

राहुल, परवीनची न्यायासाठी हाक


मुंबई : ऑगस्टमध्ये जकार्ता, इंडोनेशिया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चाचणी घेण्यावरून कुस्तीतक्षेत्रात वादंग निर्माण झाला आहे. काही खेळाडूंना चाचणीतून सूट तर काहींसाठी चाचणी अनिवार्य अशी दुटप्पीभूमिका घेतली गेली असून अशी भूमिका का घेतली गेली आहे असा सवाल राहुल आवारे, परवीन राणा या खेळाडूंनी उपस्थित केला आहे. तर भारताला पदक मिळावे, याच एकमेव हेतूने संपूर्ण अभ्यासाअंती चाचणीबाबतनिर्णय घेतल्याचा खुलासा कुस्ती निवड समितीने केला आहे.

राष्ट्रीय कुस्ती महासंघाने ९ आणि १० जूनला लखनऊ व सोनिपत येथे चाचण्या होतील, असे जाहीर करतानाच सुशीलकुमार, विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया या खेळाडूंना चाचणीस उपस्थित न राहण्याचीअनुमती दिली आहे.तर महाराष्ट्राचा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राहुल आवारे याला ५७ किलो वजनी गटात चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. 'काही खेळाडूंना चाचणीतून सूट तर आम्हाला चाचणी देण्याची सक्ती असेका? चाचणी देण्यास मी तयार आहे, पण सर्वांचीच चाचणी होऊ द्या,' अशी भावना राहुलने व्यक्त केली. तर ज्या ७४ किलो वजनी गटात सुशीलने चाचणीतून स्वतःची सुटका करून घेतली, त्या गटातील परवीन राणा यानेचाचणी देण्याची इच्छा असूनही संधी नाकारली जात असल्याचे म्हटले आहे. 'मी फिट असल्याचे पत्र महासंघाला दिलेले आहे, पण त्यांनी सुशीलला चाचणीतून सूट दिल्याने माझा मार्गच बंद झाला', असे परवीनने सांगितले.