विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज मुहूर्तावर दाखल करण्यासाठी सुट्टीतही जमले समर्थक
अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानपरिषद नाशिकविभाग शिक्षक निवडणूकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधून अनेक उमेदवारांनी नाशिक विभागीय आयुक्तालय गाठल्याने नाशिक रोड परिसर शिक्षकमय झाल्याचे चित्र नाशिक येथे दिसून आले.
दि.25 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक होत असून, यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही 7 जूनपर्यंतच असल्याने अनेक उमेदवारांनी मुहूर्त पाहून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. बुधवार दिनांक 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधत मातब्बर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन केले. त्यामुळे नाशिकरोड परिसरात किमान 10 ते 12 हजार शिक्षक अ. नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार येथून एकाच दिवशी जमा झाल्याने हा परिसर शिक्षकमय झाल्याचे चित्र दिसून आले.
धुळे येथील टीडीएफचे अधिकृत उमेदवार संदिप बेडसे, नगर येथील माध्यमिक शिक्षक संघ व टीडीएफचे उमेदवार अमृतराव उर्फ आप्पासाहेब शिंदे, शिक्षण बचाव समिती व संयुक्त टीडीएफचे जळगाव येथील शाळिग्राम भिरूड, नाशिक येथील शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, अ. नगर येथील शिक्षक परिषदेचे सुनील पंडीत या उमेदवारांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी झालेल्या मेळाव्यांत शिक्षक नसलेल्या उमेदवारांच्या विरोधात शिक्षक उमेदवारांनी राजकीय आक्रमण रोखण्याची आर्त हाक दिली. त्याचबरोबर संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कामाच्या बळावर शिक्षकांच्या आग्रहाखातर शिक्षक व शिक्षण क्षेत्राला वाचवण्यासाठी तसेच राजकीय आक्रमक थोपविण्यासाठी उमेदवारी करत असल्याचे शिंदे व भिरूड यांनी जाहीर केले. तर शिक्षक प्रश्नांसाठी आमची उमेदवारी असल्याचे बेडसे व दराडे यांनी स्पष्ट केले. यावेळी बेडसे यांना काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी तर दराडे यांना शिवसेनेने पुरस्कृत केले आहे. भाजपाने प्रथमतःच पक्षाच्या वतीने अनिकेत पाटील यांना उमेदवारी दिली पण शिक्षक परिषदेने मात्र स्वतंत्र उमेदवार देत भाजपाची काडीमोड केल्याचे चित्र दिसत आहे. टीडीएफचा मुख्य कणा समजल्या जाणार्या माध्यमिक शिक्षक संघ व टीडीएफचे वतीने शिंदे, बादशहा टीडीएफचे कचरे तर संयुक्त टीडीएफचे भिरूड मैदानात उतरले आहेत.
राजकीय आक्रमणाचा आरोप होत असूनही बेडसे, दराडे यांनी शिक्षकांना जमा करत आपण या स्पर्धेत आहोत हे दाखवून दिले. तर शिक्षक संघटनेतील 22 वर्षांची लढवय्यी कारकीर्द असलेले शिंदे व फेडरेशनचे राज्य सचिव भिरूड सारख्या शिक्षकांचे मदतीला हजारोंच्या संख्येने शिक्षक धावून येत संघटनेची ताकद दाखवून दिली. या दिवशी मात्र गर्दी जमवण्याच्या उच्चांक करत अ. नगर येथील आप्पासाहेब शिंदे यांनी विरोधी उमेदवारांना विचार करायला भाग पाडले.या वेळी संस्थाचालक नको, इंजिनिअर नको, व्यावसायिक नको, सोसायटीवाला नको तर शिक्षकच उमेदवारास आमदार करा, अशी हाक दिली असली तरी शिक्षक उमेदवारांमधून कोण थांबते की सर्वच जण उमेदवारी करतात हे 15 जून रोजीच कळेल.