छत्तीसगडमध्ये सहा नक्षलवाद्यांना अटक
रायपूर - छत्तीसगडमधील बस्तर भागात सुरक्षा दलाने शुक्रवारी सहा नक्षलवाद्यांना अटक केली. यामध्ये नावावर बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या दोन जणांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली. तीन लाखांचे बक्षीस नावे असलेल्या कांती उर्फ रामा कोर्रम (35) याला कों डागावमधून अटक करण्यात आली. एक लाखाचे बक्षीस नावे असलेल्या कोसो पोयम (35) याला बिजापूर जिल्ह्यात अटक करण्यात आली. इतर चौघांमध्ये महिलांचाही समावेश असून त्यांना दंतेवाडा इथून अटक करण्यात आली. या नक्षलवाद्यांवर शासकीय अधिकार्यांचे अपहरण करणे, पोलिसांवर हल्ले करणे व इतर अनेक आरोप आहेत.
