Breaking News

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना लागू

राज्यातील शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फलोत्पादनाला उत्तेजन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. त्याअंतर्गत राज्य पुरस्कृत नवीन फळबाग लागवड योजना यंदाच्या वर्षापासून राज्यात सुरु करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी पात्र ठरू न शकणार्‍या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असून यंदाच्या वर्षासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. राज्यात सध्या 18 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे.